Header Ads

AndBand News
recent

इधर का माल उधर

तत्वज्ञानाचे डोस असतात
संताबंताच्या गोष्टी
व्हाॅट्सवरल्या नवराबायकोत
नवराच नेहमी कष्टी

कविताकोडी व्हिडिओ फोटो
पोस्टत राहायचं भरभर
व्हाॅट्सअप म्हणजे काय दुसरं
इधर का माल उधर

मेसेजला बोटाने टचायचं..
दुस-यांच्या घरात ढकलायचं
उत्तरादाखल असं करत
स्माइलीतूनच फक्त बोलायचं

गावगप्पा उगाच गाॅसिप
भावनांचा नसतो पदर
व्हाॅट्सअप म्हणजे काय दुसरं
इधर का माल उधर

क्वचित कधीतरी वाहवा करत
द्यायची असते एखादी दाद
ग्रुपव नव्या मेंबरसाठी
वेलकम म्हणत घालावी साद

लहानमोठ्या कोणासाठी
बाळगायचा नसतो आदर
व्हाॅट्सअप म्हणजे काय दुसरं
इधर का माल उधर

प्रत्येक ग्रुपवर अखंड चालतो
न ठरणा-या पिकनकचा प्लान
वनडे आऊटींग गेटटूगेदर चर्चा
रिस्पाॅन्सही त्याला येतो छान

त्या चर्चांचं होत नाही
कधीच सत्यात रुपांतर
व्हाॅट्सअप म्हणजे काय दुसरं
इधर का माल उधर

घरातल्यांशी बोलातानाही
व्हाॅट्सअपवर एक डोळा
घरची नाती डळमळीत
आणि गाव केलं गोळा

माझंही आता व्हाॅट्सअप वाजलं
बाकीचं सांगेन नंतर
पण व्हाॅट्सअप म्हणजे
काय हो शेवटी
इधर का माल उधर

No comments:

Powered by Blogger.